बनवडी ग्रामपंचायतीतर्फे गोरगरीब गरजूंना शिव शिधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:36+5:302021-05-23T04:38:36+5:30
कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांची परिस्थिती बिकट बनली आहे. लाॅकडाऊनमुळे उद्योगधंदे नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

बनवडी ग्रामपंचायतीतर्फे गोरगरीब गरजूंना शिव शिधा
कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांची परिस्थिती बिकट बनली आहे. लाॅकडाऊनमुळे उद्योगधंदे नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींचा संसार उघड्यावर आला आहे. हे ओळखून बनवडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीने सामाजिक बांधीलकी जपत गोरगरीब आणि गरजू ग्रामस्थांना शिव शिधा पॅकेजचे घरपोहोच वाटप केले.
या उपक्रमांमध्ये सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य नरहरी जानराव, गोतपागर मॅडम, साळुंखे मॅडम, विभूते, नाथा थोरात, कृष्णत करांडे, नितीन घाडगे, दादा पाटील, योगेश मोहिते, दिलीप मदने, योगेश मोहिते, अतुल करांडे, आबा कुंभार, आदींचा सामावेश होता.
ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून गोरगरीब, शेतमजूर, वृद्ध, गरजू लोकांना शिव शिधा पॅकेज घरपोच करण्यात आले.
यामध्ये पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, पाच किलो भाजीपाला आणि काही लोकांना औषधे, तसेच इतर खर्चासाठी रोख दोनशे रुपये देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आला होता.
कोट -
सध्याची परिस्थिती बिकट असल्याने गरजू व गरीब लोकांना शिव शिधा पॅकेजच्या माध्यमातून जीवनावश्यक गोष्टींचे वाटप करण्यात आले.
विकास करांडे
उपसरपंच बनवडी ग्रामपंचायत.
फोटो ओळ....बनवडी ग्रामपंचायतीच्या शिव शिधा पॅकेज वाटपावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, आदी उपस्थित होते.