शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सु्टी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
6
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
7
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
8
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
9
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
10
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
11
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
12
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
13
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
14
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
15
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
16
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
18
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
19
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
20
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
Daily Top 2Weekly Top 5

सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा : बैठकीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:09 IST

सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही. निष्ठावान व सच्चा शिवसैनिकालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे, असा ठराव साताऱ्यात झालेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा ठराव सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देसातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा : बैठकीत ठराव निष्ठावान शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याची मागणी

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही. निष्ठावान व सच्चा शिवसैनिकालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे, असा ठराव साताऱ्यात झालेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा ठराव सादर केला जाणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी साताऱ्यात पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार बाबुराव माने, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष सचिन मोहिते, दिनेश बर्गे, प्रताप जाधव आदी उपस्थित होते.या बैठकीत प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी माजी आमदार बाबुराव माने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच प्रा. बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, एस. एस. पार्टे, नरेंद्र पाटील यापैकी एकाला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांमधून करण्यात आली.प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ह्यशिवसेनेने भाजपशी राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर युती केली आहे. १९९५ च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली असून सर्व शिवसैनिकांनी गतीने कामाला लागावे. बुथ कमिट्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. लोकसभेचा उमेदवार कोण? हे दोन दिवसांत मातोश्रीवरुन घोषित होईल. उमेदवार कोण हे महत्त्वाचं नाही, लोकसभेत शिवसेनेचा खासदार जाणं हे महत्त्वाचं आहे. सर्वांसाठी युध्दाचा काळ सुरु झाला आहे.चंद्रकांत जाधव म्हणाले, ह्यलोकसभा निवडणुकीची उमेदवारी निष्ठावान शिवसैनिकाला मिळावी, ही सर्वांची मागणी आहे. बाहेरचा उमेदवार यायचा...आमचा वापर करुन जायचा, असं आता होता कामा नये. धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार आहे. पक्षाला घातक अशा चर्चा कोणीही करु नये, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे वागू नका. उमेदवार घोषित केल्यानंतर त्याच्या प्रचाराच्या कामाला सर्वांनी लागायचे आहे.संपर्क नेत्यांसमोरच धुसफूसव्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव बोलले. यानंतर प्रा. नितीन बानुगडे-पाटील बोलायला उठणार होते, तोच एस. एस. पार्टे यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा प्रोटोकॉलनुसार तुम्ही आधीच बोलायला पाहिजे होते, असे स्पष्टीकरण जाधव यांनी केले. तरीही पार्टे काही वेळ बोलले. संघटनेचे काम करताना निष्ठावान शिवसैनिकाच्या घरावर कौले राहिली नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSatara areaसातारा परिसर