शिवसेनेचे २० मार्च रोजी आंदोलन : चंद्रकांत जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:02+5:302021-03-19T04:39:02+5:30
चंद्रकांत जाधव पुढे म्हणाले सीमाभागातील मराठी भाषिकांवंर कर्नाटक प्रशासन सातत्याने दडपशाही करत आहे. बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज उतरवून ...

शिवसेनेचे २० मार्च रोजी आंदोलन : चंद्रकांत जाधव
चंद्रकांत जाधव पुढे म्हणाले सीमाभागातील मराठी भाषिकांवंर कर्नाटक प्रशासन सातत्याने दडपशाही करत आहे. बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज उतरवून कन्नड वेदिकेचा लाल पिवळा ध्वज लावण्यात आला होता . हा सीमाभागातील मराठी अस्मितेचा प्रचंड अपमान आहे, हा अपमान शिवसेना कधी सहन करणार नाही .सीमाभागातील या कन्नड सक्तीच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील शिवसैनिक दि. २० मार्च रोजी मोठे आंदोलन उभे करणार आहे.
शिवसेनेची आगामी रणनीती व जिल्ह्यातील राजकीय बांधणी या विषयावर चंद्रकांत जाधव यांना छेडले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी साडेतीनशे कोटी जिल्ह्याला विकासकामांसाठी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यावर विशेष लक्ष आहे. सेनेची बांधणी जोमदारपणे सुरू असून आगामी पालिकेच्या निवडणूका वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे लढणार असे जाधव यांनी सांगत सातारा पालिकेत सेनेचे स्वतंत्र पॅनेल असणार आहे याचे स्पष्ट संकेत दिले.