कऱ्हाडात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:52+5:302021-02-08T04:33:52+5:30
यावेळी जयवंत शेलार म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रात आलेल्या ...

कऱ्हाडात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन
यावेळी जयवंत शेलार म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रात आलेल्या सरकारने सर्वसामन्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास दिला होता. मात्र, सत्तेवर आल्यापासून भाजप सरकारने डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसची दरवाढ सुरूच ठेवली आहे. ही दरवाढ कमी न केल्यास राज्यात शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाईल.
नितीन काशीद म्हणाले, भूलथापा व खोटी आश्वासने देऊन केंद्रात मोदी सरकार आले आहे. सध्या दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढत चालले आहेत. सातत्याने गॅसचीही दरवाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने सामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, रवींद्र पाटील, तालुकाप्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनिता जाधव, शिवसेना ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, काकासाहेब जाधव, कऱ्हाड शहरप्रमुख शशिराज करपे, दशरथ धोत्रे, पोपट कांबळे, साजीद मुजावर, ऋषिकेश महाडिक, सुरेश पाटील, सुनील संकपाळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : ०७केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात इंधर दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.