गॅस, इंधन दरवाढीविरोध शिवसेनेचा आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:52+5:302021-02-07T04:35:52+5:30
वाई : कोरोनाच्या महामारीने जनता त्रस्त असताना केंद्र शासन मात्र दररोज पेट्रोल व डिझेल भाववाढ तसेच गॅसच्या दरात वाढ ...

गॅस, इंधन दरवाढीविरोध शिवसेनेचा आंदोलन करणार
वाई : कोरोनाच्या महामारीने जनता त्रस्त असताना केंद्र शासन मात्र दररोज पेट्रोल व डिझेल भाववाढ तसेच गॅसच्या दरात वाढ करून गृहिणींना वेठीस धरत आहे. जनतेचे अतोनात हाल होत असताना विरोधी पक्षांतील आमदार मात्र राजकारण करण्यात मग्न आहेत. त्यांना राज्यातील जनतेचे काहीही देणेघेणे नाही, याचा जाब विचारण्यासाठी वाई तालुका शिवसेना या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांना दिले.
नोटाबंदी आणि कोरोनाच्या आयात संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना दररोज विविध प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून सरकारने जनतेला जगणे मुश्कील करून सोडले आहे. मोदी सरकारविरोधात जनतेत असंतोष पसरला असून, अशा प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महाआघाडी सरकार यापुढे प्रयत्न करीत राहील. तरी झालेली दरवाढ त्वरित मागे घ्या, अन्यथा वाई तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना उपतालुकाप्रमुख विवेक भोसले, शहराध्यक्ष गणेश जाधव, योगेश चंद्रस, गौतम यादव, ज्येष्ठ शिवसैनिक तुळशीदास पिसाळ, मंदार खरे, स्वप्निल भिलारे यांच्या सह्या आहेत.