शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Satara: याला हटवा, त्याला काढा; 'उध्दव'सेनेच्या मेळाव्यात राडा!

By प्रमोद सुकरे | Updated: July 16, 2024 15:13 IST

'शिवसैनिक म्हणतात हे तर आमच्या जिवंतपणाचे लक्षण'

प्रमोद सुकरेकराड : राज्याच्या राजकारणात रगेल म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा आणि सांगली जिल्ह्याचा पदाधिकारी मेळावा नुकताच कराडला झाला. पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यासमोर पदाधिकारी आपल्या भावना व्यक्त करत असताना हा काम करत नाही त्याला हटवा, त्याला काढा अशा रोखठोक भावनाही काही पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. पण सुरुवातीला झालेली ही शाब्दिक चकमक शेवटी 'राड्या'पर्यंत पोहोचली.याबाबत उलट सुलट चर्चा असल्या तरी शिवसैनिक तर हे आमच्या जिवंतपणाचे लक्षण आहे असे सांगताना दिसत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, तालुकाप्रमुख ,तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचा संयुक्तिक मेळावा कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात पार पडला. यावेळी पक्षाचे नेते भास्करराव जाधव, नेत्या वैशाली शिंदे, उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील,संयोजक प्रमुख हर्षद कदम यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होते.यावेळी भास्कर जाधव यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घ्यायला सुरुवात केली. ज्यावेळी सांगली जिल्ह्याचा आढावा आला तेव्हा एका नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांने एका जुन्या पदाधिकाऱ्यावर काम व्यवस्थित होत नसल्याची टीका केली. त्यावेळी सभागृहात उपस्थित पदाधिकाऱ्यांच्यात तू तू मैं मैं झाले. पण समारोपाच्या वेळी हे वातावरण राड्यापर्यंत पोहोचले. शेवटी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करीत हा विषय तात्पुरता संपवला. पण याचे भविष्य काळात काय परिणाम होतील? ते पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.

सातारच्या पदाधिकाऱ्यावरही नाराजी!सातारच्या एका पदाधिकाऱ्याबाबतही एका कार्यकर्त्यांने कामाबाबत असमाधानी असल्याचे सांगत त्यांना बदलण्याची भूमिका मांडली. त्यावेळी सभागृहात त्याचे पडसाद उमटले नाहीत.पण सांगलीचा प्रकार झाल्यानंतर  सभागृहातून बाहेर पडताना पुन्हा त्या दोन पदाधिकाऱ्यात जुंपल्याचे अनेकांनी पाहिल्याची चर्चा आहे.

कराडच्या पदाधिकाऱ्यालाही कार्यकर्त्यांनी सुनावलेकार्यक्रमाच्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असताना कराडातील एका पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत नेत्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी तो सांगलीचा प्रश्न आहे. त्यांचे ते बघतील असे त्या नेत्याला सुनावले त्याचीही  शिवसैनिकांच्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.

शिवसैनिकांच्या भावना,भूमिका समजून घेण्यासाठीच पक्षनेते आले होते. त्या भूमिका मांडत असताना शिवसैनिक आवेशाने बोलले .ती शिवसेनेची स्टाईलच आहे. त्यातून किरकोळ चिडाचिडीचे प्रकार झाले. फार मोठे काही घडलेले नाही.पक्षीय पातळीवर हे चालत राहते. - हर्षद कदम, जिल्हाप्रमुख, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेKaradकराड