तरडगावमधील लॉकडाऊन शिथिल करण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:41+5:302021-08-14T04:44:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील लॉकडाऊन शिथिल करावे, या व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या मागणीवरून ...

तरडगावमधील लॉकडाऊन शिथिल करण्याची शिवसेनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील लॉकडाऊन शिथिल करावे, या व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या मागणीवरून तालुका शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना तशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, सततच्या गाव बंद ठेवण्यामुळे तरडगाव येथील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पूर्ण गाव बंद राहिल्याने सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ज्या भागात कोरोनाबाधित आढळतील तोच भाग बंद ठेवून इतर दुकाने व बाजारपेठ खुली करावी. संपूर्ण गावाला पूर्णतः वेठीस न धरता योग्य निर्णय लवकर घ्यावा.
यावेळी शिवसेना फलटण तालुकाप्रमुख विकास नाळे, प्रदीप झणझणे, स्वप्निल मुळीक, आदित्य गायकवाड, श्रीधर गायकवाड, वैष्णव गायकवाड, सचिन बिडवे, सचिन मिसाळ, माऊली कदम, तुषार वाडकर, अब्दुल काझी उपस्थित होते.