शिरवळला विलगीकरण कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:06+5:302021-05-31T04:28:06+5:30

शिरवळ : महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनंतर व सातारा जिल्हा प्रशासन व खंडाळा प्रशासनाच्या कडक धोरणानंतर शिरवळ ग्रामपंचायतकडून ६० बेडचा विलगीकरण ...

Shirwal separation room started | शिरवळला विलगीकरण कक्ष सुरू

शिरवळला विलगीकरण कक्ष सुरू

शिरवळ : महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनंतर व सातारा जिल्हा प्रशासन व खंडाळा प्रशासनाच्या कडक धोरणानंतर शिरवळ ग्रामपंचायतकडून ६० बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे, उपसरपंच सुनील देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, प्रकाश परखंदे, सचिन राऊत, विकास तांबे, महेश जाधव, ममता पिसाळ, आशा कारळे, रूपाली गिरे, अनुप सूर्यवंशी, प्रदीप माने, ग्रामविकास अधिकारी बबन धायगुडे, सागर पानसरे, उमेश गिरमे आदी उपस्थित होते.

शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी प्रशालेत सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Shirwal separation room started