शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

शिरवळ पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची धिंड, निर्भया पथकाकडूनही कारवाईचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 11:28 IST

शिरवळ : शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांना शिरवळ पोलिसांनी दणका दिला असून, अवैध धंदे करणाऱ्या वीस ...

शिरवळ : शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांना शिरवळ पोलिसांनी दणका दिला असून, अवैध धंदे करणाऱ्या वीस जणांची शिरवळमधून धिंड काढली. तर दुसरीकडे फलटण उपविभागाअंतर्गत असणाऱ्या निर्भया पथकाकडून कारवाईचा धडाका शिरवळ व परिसरामध्ये करत कारवाईचा डब्बल बार चालू ठेवला आहे. शिरवळ पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द उघडलेल्या धडक कारवाईचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतला आहे.शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन पंधरा वर्षीय युवतीच्या आत्महत्येच्या प्रकारानंतर शिरवळ पोलिसांनी व फलटण उपविभागाअंतर्गत असणाऱ्या निर्भया पथकाने छेडछाड करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध तसेच अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहे. यावेळी शिरवळ पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) हातभट्टी दारू विक्री करणारे, मटका व्यावसायिक व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये संबंधितांची असणारी दहशत मोडीत काढण्याकरिता व नागरिकांत भीतीमुक्त वातावरणनिर्मितीकरिता शिरवळच्या पोलिस पथकाने अवैध धंदे करणाऱ्यांची शिरवळ व परिसरातून मुख्यतः शिरवळ पोलिस स्टेशन परिसर, एस.टी. बसस्थानक परिसर, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह, चावडी चौक, बाजारपेठ, रामेश्वर परिसर अशी धिंड काढली.

शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांबद्दल नागरिकांनी न घाबरता शिरवळ पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, अवैध धंदे करणाऱ्यांची शिरवळ पोलिस गय करणार नसून, संबंधितांची केवळ धिंड न काढता कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे. -नवनाथ मदने, पोलिस निरीक्षक, शिरवळ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी