राष्ट्रीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत सातारच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:16+5:302021-09-05T04:44:16+5:30
सातारा : ॲमॅच्युअर स्पोर्ट्स कीक बॉक्सिंग असोसिएशन, गोवा यांच्यावतीने गोवा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या ...

राष्ट्रीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत सातारच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
सातारा : ॲमॅच्युअर स्पोर्ट्स कीक बॉक्सिंग असोसिएशन, गोवा यांच्यावतीने गोवा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या सातारा येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
यामध्ये तुषार पवार याने सुवर्णपदक, यश नडे याने रौप्यपदक तर दीप सुर्वे याने कांस्यपदक जिंकण्याचा मान मिळवला. या स्पर्धेदरम्यान निशांत केंडे याने अत्यंत चांगल्याप्रकारे परीक्षण केले. या सर्वांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र राज्य कीक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शेलार व सचिव धीरज वाघमारे व सातारा जिल्हा कीक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष दया शितोळे, उपाध्यक्ष शोभा केंडे, खजिनदार व प्रशिक्षक तेजस यादव, सचिव अंकुश जांभळे, राजेंद्र मोहिते, सिध्दार्थ गुजर, राकेश शेंडगे, जयवंत गोडसे, आकाश धनावडे, परेश लाटकर, गजानन हुंबरे यांच्यावतीने कौतुक करण्यात आले.
०४ बॉक्सिंग नावाने फोटो आहे
...........