शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: पाटणमध्ये शिंदेसेनेची सत्ता; भाजपमध्ये जाऊनही पाटणकर गट अपयशी

By दत्ता यादव | Updated: February 11, 2026 17:07 IST

भाजपला केवळ एका जागेवर समाधान

दत्ता यादवसातारा : पाटण पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. तालुक्याच्या राजकारणावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली पकड अधिक मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या १४ गणांपैकी १३ जागांवर शिंदेसेनेने विजय मिळवला, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पंचायत समितीवर शिंदेसेनेचा भगवा फडकला आहे.जिल्हा परिषद गटातही शिंदेसेनेची घोडदौड कायम राहिली असून, सात गटांपैकी सहा गटांत शिंदेसेनेने विजय मिळवला आहे. भाजपला येथेही केवळ एका गटावर विजय मिळवता आला. या निकालांमुळे भाजपसाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक तुल्यबळ मानली जाणारी पाटणकर-देसाई गटाची पारंपरिक राजकीय लढत या निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेत आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे हे निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारे मानले जात आहेत.गोकुळ तर्फे हेळवाक हा संपूर्ण जिल्हा परिषद गट सत्यजितसिंह पाटणकर यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, उमेदवारीपासूनच विरोधकांनी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आले. गट व गणात मोठ्या फरकाने शिंदेसेनेने विजय मिळवत बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. हा विजय शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी उभारी देणारा ठरला आहे.म्हावशी जिल्हा परिषद गटात राजेश पवार (भाजप) व भरत साळुंखे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे राजेश पवार यांनी बाजी मारली आणि ते भाजपचे एकमेव विजयी उमेदवार ठरले. या गटात एक जागा शिंदेसेनेला तर एक भाजपला मिळाली. हा गटही पाटणकरांचा बालेकिल्ला मानला जात होता. मंद्रुळकोळे गटात आमदार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांचा १०१९ मतांनी पराभव झाला. विविध सामाजिक उपक्रम असूनही मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. हा पराभव नरेंद्र पाटील व हिंदुराव पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे.कालगाव, तारळे, मल्हारपेठ व मारुल हवेली या गटांचे निकाल भाजप कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरले. काळगाव गटात भरत पाटील यांच्या पत्नींचा मोठ्या फरकाने पराभव झाला. एकूणच देसाई गटाने पाटण पंचायत समितीवर आपली एकहाती सत्ता कायम राखत तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Sena Dominates Patan ZP Election, Patankar Faction Fails Despite BJP Alliance

Web Summary : Shinde's Sena secured a sweeping victory in the Patan Panchayat Samiti and Zilla Parishad elections, winning most seats. Despite joining BJP, the Patankar faction failed. This outcome highlights Shambhuraj Desai's strong political hold and signals future political shifts in Satara.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेShambhuraj Desaiशंभूराज देसाईBJPभाजपा