शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे एकत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:52+5:302021-02-08T04:34:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. अशाचप्रकारे मागील चार ...

शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे एकत्र!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. अशाचप्रकारे मागील चार दिवसांपूर्वी एकमेकांवर आरोप करणारे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले व जवळजवळ बसलेही. त्यामुळे झाले गेले विसरून जावे, असाच संदेश त्यांनी यामधून दिल्याची चर्चा रंगली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्याअगोदरच जिल्ह्यात राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. आरोप-प्रत्यारोप, टीका- टिपणी सुरू झाली आहे. अशातच आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकमेकांवर आरोपाच्या फैरी सोडल्या होत्या. त्यामुळे राजकीय संघर्ष वाढणार अशी चर्चा होती. पण, चार दिवसांतच दोघेही एका कार्यक्रमात जवळजवळ बसताना आणि बोलतानाही दिसून आले.
सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथील एका कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे हे शिवेंद्रसिंहराजेंच्या शेजारीच जाऊन बसले. यावेळी दोघांनी काही गप्पाही मारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू असत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
फोटो दि.०७सातारा शिवेंद्रसिंहराजे फोटो...
फोटो ओळ : सातारा तालुक्यातील एका कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे भोसले जवळजवळ बसून गप्पा मारताना दिसून आले.
.....................................................