शिरवळमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:54 IST2019-04-12T23:54:21+5:302019-04-12T23:54:26+5:30

शिरवळ : शिरवळ येथील ‘लोकमत’चे पत्रकार मुराद पटेल (वय ३२) यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या ...

Sharjah attacks journalist | शिरवळमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला

शिरवळमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला


शिरवळ : शिरवळ येथील ‘लोकमत’चे पत्रकार मुराद पटेल (वय ३२) यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, शिरवळ येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पत्रकार मुराद पटेल हे गुरुवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमरास आपली दैनंदिन कामे आटोपून घराकडे निघाले होते. सटवाई कॉलनी येथील मदरसाजवळ त्यांची दुचाकी आली असता अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात सहा हल्लेखोरांनी मुराद पटेल यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी लावली. यानंतर त्यांनी काही समजण्याच्या आतच मुराद पटेल यांच्यावर सत्तूर व चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी वार केले.
मुराद पटेल यांनी आरडाओरड करताच मदरसामधील मुलांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मुलांना पाहून हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले. या हल्ल्यात पटेल यांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी घटनास्थळी येऊन मुराद पटेल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या
घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, पोेलीस निरीक्षक विनायक वेताळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sharjah attacks journalist