शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'थोरल्या' पवारांची प्रीतिसंगावरुन नवी इनिंग सुरु!; महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार

By प्रमोद सुकरे | Updated: July 3, 2023 16:22 IST

..तेव्हा अजित पवारांनी कराडला येवून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी बसून आत्मक्लेष केला होता

प्रमोद सुकरेकराड : दिवंगत यशवंतराव चव्हाण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाते खूप जुनेच आहे. शरद पवार तर यशवंतरावांना गुरुस्थानी मानतात. आणि अख्खा महाराष्ट्र पवारांना यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून ओळखतो. ज्या ज्या वेळी पवार एखादी नवीन गोष्ट करतात. त्यात्या वेळी ते कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नक्कीच नतमस्तक व्हायला येतात. आता राज्यात विशेषता राष्ट्रवादीत 'धाकट्या' पवारांनी भूकंप केल्यानंतर 'थोरले' पवार आज, सोमवारी कराडला आले. स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे.यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. देवराष्ट्रे हे त्यांचे मूळ गाव असले तर कर्मभूमी मात्र कराड राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यविधी कराडातच करण्यात आले. तर कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रतिसंगमावर त्यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. हे स्मृतिस्थळ महाराष्ट्राची जणू राजकीय पंढरीच बनली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  माजी आमदार दिवंगत पी डी पाटील यांनी हे स्मृतिस्थळ उभारण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले ,अपप्रवृत्ती बाजूला करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक शक्ती दाखवण्याची गरज आहे. त्याची सुरुवात आपण आज करत आहोत. आणि ती करण्यासाठी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाशिवाय दुसरी कोणतीही योग्य जागा नाही. म्हणून मी आज येथे आलो आहे. आज गुरु पौर्णिमाही आहे गुरूंच्या स्मृतीस्थळाला नतमस्तक होऊन येणाऱ्या काळात आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असलेली त्यांनी यावेळी सांगितले.

 अजित पवारांनीही केला होता आत्मक्लेश राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील २००८/९ साली यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी आत्मक्लेष केला होता. एका भाषणामध्ये बोलताना अजित पवारांची जीभ  घसरली होती. त्यावर महाराष्ट्रातून वाईट प्रतिक्रिया येत होत्या. तेव्हा अजित पवारांनी कराडला येवून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी बसून आत्मक्लेष केला होता.

हजारो समर्थकांची उपस्थिती !शरद पवार यांच्या या कराडातील दौऱ्याची तयारी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष