शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"शरद पवार आयपीएलचे जनक, ते संघही ठरवतील अन् खेळाडूही"

By दीपक देशमुख | Updated: January 21, 2024 18:37 IST

शशिकांत शिंदे यांच्या गुगलीमुळे राजकीय उलथापालथीचे संकेत.

 सातारा : खा. शरद पवार हेच आयपीएलचे जनक असून त्यांनीच देशात आयपीएल आणली. त्यामुळे कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणता संघ खेळणार, कोणाची विकेट घ्यायची हे खा. शरद पवारच ठरवतील, अशी राजकीय गुगली टाकत आ. शशिकांत शिंदे यांनी भविष्यातील राजकीय उलथापालथीचे संकेत दिले आहेत.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड येथील दौऱ्यात फडणवीस यांनी खा. उदयनराजेंना आयपीएलच्या संघाचे मालक असे संबोधले होते, त्याबाबत  छेडले असता आ. शशिकांत शिंदे म्हणाले, खा. शरद पवार यांनीच देशात आयपीएल आणली आहे. त्यामुळेच कोणता संघ खेळेल, कोणता खेळाडू पुढे येईल. हे तेच ठरवतील.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीस यांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे. बाबरी मशीद पाडली, त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हते. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवले. शिवसेनेने घटनेची जबाबदारी घेतल्याचे व त्या शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे जाहीर केले. आज मात्र सर्वजण याचे श्रेय घेत आहेत आहेत.

आ. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भुमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार करावा. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल. सरकारने समाजात तेढ वाढू नये, यासाठी प्रयत्न करावे आणि आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार हे स्पष्ट करावे. मुंबईला आंदोलनकर्ते आले तर मुंबई आणि पर्यायाने देश ठप्प होईल. देशाची निवडणूक लोकांनी हातात घेतली तर इतिहास घडेल. अन्यथा पुढील निवडणुक होईल हेही सांगता येणार नाही. भाजपाने इतर पक्षातील मातब्बर नेते घेतले तरीही ईडीच्या धाडी विरोधकांच्या घरी पडत आहेत. हीच का लोकप्रियता असा सवाल आ. शिंदे यांनी केला.

देवाला धर्मात वाटू नकाप्रभू श्रीराम कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. देवाला धर्मात वाटू नये, राजकीय इव्हेंट हाेवू नये. अयोध्येचे मंदिर खूप वर्षांनंतर होत असून त्याचा आनंद आम्हा सर्वांनाच आहे.  

माझी चर्चा झाली तर इतर सावध होतातलोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा होत असल्याचा आनंद आहे. पण माझ्या उमेदवारीबाबत सध्या तरी बोलणार नाही, कारण मी बोललाे की बाकीचे सावध होतात, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेsatara-acसाताराSharad Pawarशरद पवार