शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात उद्या शरद पवार, फडणवीसांची तोफ धडाडणार

By नितीन काळेल | Updated: May 3, 2024 18:56 IST

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे ...

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा शहरात सभा होणार आहे. या सभेतून दोघे कोणती तोफ डागणार आणि काय आवाहन करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष असणार आहे.सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवार रणांगणात आहेत. ही निवडणूक प्रामुख्याने भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच होत आहे. या निवडणुकीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातूनही जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तसेच प्रचारालाही गती देण्यात आलेली आहे.तसेच आतापर्यंत दोन्हीही उमेदवारांसाठी राज्य तसेच राष्ट्रीय पातवळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. सध्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून अजूनही मोठ्या सभा घेण्याचा धडाका सुरूच आहे. यामुळेच शनिवारी साताऱ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे.शनिवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी पाचला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यातील तालीम संघ मैदानावर सभा होत आहे. महायुती उमेदवार व खासदार उदयनराजेंसाठी ही सभा असणार आहे. तर सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यातीलच जिल्हा परिषद मैदानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. दोन्हीही सभा एकाचवेळी होणार असल्याने दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस