शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

ना वारकरी बिघडतील, ना धारकरी, सरकारच्या वाईन विक्री धोरणाला शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:15 IST

विरोधी पक्षांचा वाईनला विरोध हा राजकीय स्वरूपाचा

सातारा : महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट, मॉल, किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरातून तीव्र विरोध होत आहे. मात्र शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. इतकच नाही तर सरकारच्या या निर्णयाला खंबीर पाठिंबा देखील दिला आहे.द्राक्ष उत्पादकांवर कर्जाचा जास्त बोजा आहे. त्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. वाईनवरील बंधने हटवल्याने शेतकऱ्यांची अगतिकता संपेल. प्रक्रियेसाठी द्राक्षे वापरली गेली तर ती जास्त काळ टिकतील. आत्ताच्या थेट वापर बाजारात पुरवठा कमी झाल्याने भाव वधारतील, अशी शक्यता आहे. तसेच आता खराब द्राक्षे फ़ेकून द्यावी लागतात. त्यांनाही किंमत मिळेल. नुकसान कमी होईल. धान्यापासून दारू करू लागल्यापासून हे सिद्ध झाले आहे.मद्यराष्ट्र होईल ही भीती नसून संधी वाईनला अशाप्रकारे परवानगी दिल्याने रोजगार संधी वाढतील. जनतेला आरक्षणाची गरज नसून शेती किफायतशीर बनवणारी धोरणे गरजेची आहेत. तसेच महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होईल ही भीती खरी नसून ती संधी आहे. महाराष्ट्र मद्य उत्पादक राज्य म्हणून अव्वल बनल्यास शेतमालाचे भाव वाढण्याबरोबर रोजगार, वाहतूक, पॅकिंग, शीतगृह, बाजारपेठ, पर्यटन, मशिनरी व्यवसाय, व्यापार व अनुषंगिक बाबीत उलाढाल वाढेल शिवाय सरकारला कर मिळेल.काजू, करवंदे, जांभूळच्या वाईनने अर्थकारण सुधारेलइतकेच नाही तर डोंगराळ भागातील तरुण पुण्या-मुंबईला रोजगारासाठी जातात. त्यांचे शेतातील काजू, करवंदे, जांभूळच्या वाईनने अर्थकारण सुधारेल. विरोधी पक्षांचा वाईनला विरोध हा राजकीय स्वरूपाचा आहे. शेतकरी मेला तरी चालेल या वृत्तीचा आहे. विरोध करताना ते मद्यराष्ट्र असा घोषणा लावतात, ही दिशाभूल आहे.

'ते' अगोदर बिघडलेलेच मुळात वाईनच्या परवानगीमुळे चंगीभंगी वारकरी धारकरी तेव्हढे बिघडतील. ते अगोदर बिघडलेलेच आहेत. तसे सारे बिघडणार नाहीत. जगात मद्य पिणाऱ्या अनेकांनी नवनवीन शोध लाऊन मानवाचे कल्याण केले आहे. अनेकांनी उत्तम साहित्य निर्मिती केली आहे, असेही शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या देशात सरकारने मद्य घेणाऱ्या अनेकांना पद्मश्रीपासून भारतरत्नपर्यंतचे पुरस्कार दिले आहेत. मद्यपान करणारे अनेक पुढारी, मंत्री, नेते, प्रशासकीय अधिकारी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे वाईनचा बाऊ करू नये. आताही वाईन विक्रीबाबत काही बंधने ठेवली आहेत ती काढून टाकावीत. अन्यथा वाईनच्या समर्थनार्थ श. जोशी प्रणित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. - बाळासाहेब चव्हाण, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी