शांताई पार्क वडूजच्या वैभवात भर टाकेल : विठ्ठल महाराज स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:17+5:302021-02-05T09:17:17+5:30

वडूज : ‘तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराची व्याप्ती पाहता दिवसेंदिवस वडूजमधील स्थायिक होण्याची संख्या वाढतच चालली आहे. गोडसे बंधूंनी ...

Shantai Park will add to the glory of Vadodara: Vitthal Maharaj Swami | शांताई पार्क वडूजच्या वैभवात भर टाकेल : विठ्ठल महाराज स्वामी

शांताई पार्क वडूजच्या वैभवात भर टाकेल : विठ्ठल महाराज स्वामी

वडूज : ‘तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराची व्याप्ती पाहता दिवसेंदिवस वडूजमधील स्थायिक होण्याची संख्या वाढतच चालली आहे. गोडसे बंधूंनी सामाजिक हेतू आत्मसात करून वडूज शहरात सर्वसोयींनीयुक्त आपल्या हक्काचे घर बांधण्यासाठी शांताई पार्कची निर्मिती केली. उदात्त हेतूने केलेले हे कार्य वडूजच्या वैभवात निश्चितच भर टाकेल,’ असे प्रतिपादन जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती हभप विठ्ठल महाराज स्वामी यांनी केले.

येथील भव्य-दिव्य जागेत गोरगरिबांना अपेक्षित आपल्या हक्काचे कमी खर्चात घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी गोडसे बंधूंनी उभारलेल्या शांताई पार्कच्या फलक अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संभाजी गोडसे, शहाजी गोडसे, मनीषा जाधव, सुमन गोडसे, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष प्रवीण जाधव, निशिकांत गोडसे, सुरेखा जोशी, प्रणव गोडसे, अमोल गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खादी ग्रामोद्योगचे उपाध्यक्ष संतोष गोडसे, मनोज माने, अभिजित भागवत, रमेश राऊत, दिनेश शेटे, राजाराम जाधव, घाडगे मॅडम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जाधव यांनी केले. वामन कमाने यांनी आभार मानले. (वा.प्र.)

०३वडूज जाहिरात...

फोटो : वडूज येथील शांताई पार्कच्या फलक अनावरणप्रसंगी हभप. विठ्ठल महाराज, हणमंत गोडसे, संभाजी गोडसे आदी उपस्थित होते.

Web Title: Shantai Park will add to the glory of Vadodara: Vitthal Maharaj Swami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.