शंकर सारडा उत्कृष्ट समीक्षक होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:41+5:302021-02-05T09:16:41+5:30
सातारा : ‘शंकर सारडा हे उत्कृष्ट लेखक व समीक्षक होते. त्यांच्यामुळेच साताऱ्यात १९९३ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ...

शंकर सारडा उत्कृष्ट समीक्षक होते
सातारा : ‘शंकर सारडा हे उत्कृष्ट लेखक व समीक्षक होते. त्यांच्यामुळेच साताऱ्यात १९९३ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ शकले. हेच साहित्य संमेलन मैलाचा दगड ठरले’, असे उद्गार सातारा ग्रंथ महोत्सव समितीचे शिरीष चिटणीस यांनी काढले.
ज्येष्ठ लेखक, समीक्षक व व्याख्याते व सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष शंकर सारडा यांना दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी झालेल्या शोकसभेत ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. राजेंद्र माने, प्रा. यशवंत पाटणे, विनोद झवर, आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र माने म्हणाले, शंकर सारडा हे मितभाषी होते. त्यांनी आपल्या पुस्तकावर लिहावे, असे प्रत्येक लेखकाला वाटायचे. लेखकांची पिढी घडविण्याचे काम त्यांनी केले. यावेळी प्रकाश गवळी, विनोद झवर, प्रदीप कांबळे, डॉ. संदीप श्रोत्री यांनी मनोगत व्यक्त केले.