शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस, तिघांना संधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:18 IST

भाजपची रणनीती पाहता पक्षाला जिल्ह्याचा ताबा घ्यायचा आहे

सातारा : राज्यात भाजप-शिवसेना (बंडखोर) युतीचे सरकार आले असून, आता जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून माजी मंत्री शंभूराज देसाईंना लॉटरी लागणार असलीतरी भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे दावेदार आहेत. गोरे यांच्यामुळे माण तालुक्याला प्रथमच ‘मान’ मिळू शकतो.राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्याचे नाव अधोरेखित आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने तीन मुख्यमंत्री दिले, तर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याने मुख्यमंत्रिपदाचा चौकार ठोकला आहे. तसेच जिल्ह्याची मंत्रिपदाची कमान सतत चढती राहिली. गेल्या काही वर्षांचा विचार करता जिल्ह्यात तरुण नेते उदयास आले. त्यांच्याकडे नेतृत्व तसेच कर्तृत्व असल्याचेही दिसले. यामुळे जिल्ह्यातील नेत्यांचा दबदबा विधिमंडळातही दिसून आला. जयकुमार गोरेंसारखे आमदार अनेक विषयांवर आवाज उठवत असतात.जिल्ह्याचा मागील चार वर्षांचा विचार करता राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळले. काँग्रेसलाही गळती लागली. यातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी कमळ हातात घेतले. सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत, तर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन व काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपची रणनीती पाहता पक्षाला जिल्ह्याचा ताबा घ्यायचा आहे.त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेकांना पक्षात घेऊन ताकद देण्याचे काम करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हे गेल्या काही वर्षात भाजपमध्ये गेले, तर त्यापूर्वी डॉ. अतुल भोसले यांनीही पक्षांतर केलेले. सद्यस्थितीचा विचार करता जिल्ह्यात भाजपच राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकते, असे चित्र आहे. त्यातच शिवसेनेचा गट बरोबर येण्याने भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

पावणेतीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांनी कमळ हाती घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमारांना आमदार करा, मंत्रिपद मी देतो, असे लोकांना आश्वस्त केलेले. त्याचबरोबर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. फडणवीस यांनीही त्यांना शब्द दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे युती सरकार पुन्हा आल्याने भाजपमधून हे दोघे मंत्री असू शकतात.

शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री...

पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते प्रथम गेले होते. त्यामुळे देसाई यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळू शकते, अशी शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेShambhuraj Desaiशंभूराज देसाईShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपा