Shambhu Mahadev Yatra at Shikhar Shingnapur canceled | शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द

सातारा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.

शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा १७ ते २७ एप्रिल या कालावधी होणार असून यात्रेचा मुख्य दिवस २३ व २४ एप्रिल २०२१ हा आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असून जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड यांनाही कळविण्यात आले आहे.

Web Title: Shambhu Mahadev Yatra at Shikhar Shingnapur canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.