माण तालुक्यात ‘शेखरभाऊचा जय’ हो!

By Admin | Updated: August 6, 2015 22:24 IST2015-08-06T22:24:17+5:302015-08-06T22:24:17+5:30

दहिवडीत सत्तांतर : अटीतटीच्या लढतीत छोट्या भावाची विजयी घोडदौड

'Shakhalbhau jai' in Maan taluka! | माण तालुक्यात ‘शेखरभाऊचा जय’ हो!

माण तालुक्यात ‘शेखरभाऊचा जय’ हो!

म्हसवड : माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, कुकुडवाड ग्रामपंचायतींवर पंचायत समिती सदस्य शेखर गोरे गटाने वर्चस्व मिळविले असून, आमदार जयकुमार गोरे यांनी ताब्यातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत प्रचारास कमी वेळ मिळूनही पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांचाच वरचष्मा राहिल्याचे निकालावरून दिसून आले.
ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. या निवडणुकीत पळसावडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ‘रासप’च्या पॅनेलमधून मायाक्का जिजाबा काळे यांनी आईचा पराभव केला. गोंदवले बुद्रुकमध्ये मधुकर कट्टे व सुरेश भोसले यांना समान मते पडल्याने त्याठिकाणी चिठ्ठी टाकून मधुकर कट्टे यांना विजयी घोषित केले. दहिवडीत अरुण पवार व बसवलिंग साखरे यांनाही समान मते पडली. त्यामध्ये बसवलिंग साखरे हे चिठ्ठीद्वारे विजयी झाले. सोकासन ग्रामपंचायतीत वसंत जाधव व हरिबा जाधव यांना समान मते पडली. त्यांच्यातही चिठ्ठी टाकून हरिबा जाधव यांना विजयी घोषित केले.
माण तालुक्यातील पहिल्या टप्प्यात झालेल्या ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीत सत्तांतर होऊन आमदार गटाकडून सत्ता खेचून आणण्यात शेखर गोरे गटाला यश आले. आमदार गोरे गटाने गोंदवले बुद्रुक व गोंदवले खुर्द ग्रामपंचायतीत वर्चस्व कायम राखले आहे. मार्डीमध्ये सदाशिव पोळ यांनी नऊ विरुद्ध चार अशी सत्ता राहिली. गोंदवले बुद्रुकमध्ये बाळासाहेब माने यांनी आमदार गोरे यांच्या साथीने काठावरचे बहुमत मिळवून विजय मिळविला. राणंदमध्ये जयकुमार गोरे, अनिल देसाई विरुद्ध सदाशिव पोळ, शेखर गोरे अशी लढत झाली. त्याठिकाणी शेखर गोेरे यांचे पारडे जड ठरले. (प्रतिनिधी)

पती-पत्नी विजयी
कुकुडवाड ग्रामपंचायतीत पती संजय जाधव व पत्नी शोभा जाधव हे दोघे निवडून आले आहेत. संजय जाधव हे यापूर्वी सरपंच होते.

गुंडगेंचे पुत्र पराभूत
अ‍ॅड. भास्कराव गुंडगे यांचा मुलगा व सूनबाई या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तेथे विद्यमान सरपंच धनाजी जाधव यांची पत्नी विजयी झाल्या.
आमदार जयकुमार गोरे गटाची सत्ता आलेली ग्रामपंचायत : गंगोती, बोडके, शेवटी, शंभूखेड, गोंदवले खुर्द, शिरवळी, गट्टेवाडी, ढाकणी, भाटकी, धामणी, तोंडले, जासी, वडजल, हिंगणी, मोही, जांभुळणी, पाणवन, वाकी, गोंदवले बुद्रुक.
पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांच्या गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायती : येळेवाडी, बोकडे, मोगराळे, भालवडी, वर-म्हसवड, पिंगळी खुर्द, घोटेवाडी, शिंदे खुर्द, काळचौंडी, पळसावडे, कुळकजाई, पुळकेवाडी, वडगाव, खडकी, घदाळे, श्रीपालवण, स्वरुपखानवाडी, खारखेल, पिंगळी बुद्रुक, शिंदी बुद्रुक, पर्यंती, मार्डी, कुकुडवाड, वळई, सोकावन, राणंद, दहिवडी.
गाव पॅनेलकडे : हवालदार वाडी, टाकेवाडी, भांडवली.

Web Title: 'Shakhalbhau jai' in Maan taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.