Shahupuri police raid gambling den | शाहूपुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

शाहूपुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

सातारा : शाहूपुरी पोलिसांनी मोळाचा ओढा ते आझादनगर जाणाऱ्या रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर केलेल्या कारवाईत पोलिसांनी ३४ हजार ७१६ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

या परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तेथून काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना सीआरपीसी ४१ (१) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये किरण रवींद्र तपासे (वय २६, रा. गुरुवार पेठ, सातारा), सागर श्यामराव चव्हाण (वय ३१, रा. तामजाईनगर, आदर्श कॉलनी, करंजे, सातारा), नितीन अनिल कुऱ्हाडे (वय ३४, रा. ४२९, एकता कॉलनी, करंजे, सातारा), गोरक्षनाथ विनायक जाधव (वय ३२, रा. वर्ये, मु. पो. सैदापूर, दत्त मंदिराच्या शेजारी, ता. सातारा), धनाजी शंकर वाघमारे (वय ५२, रा. ४२९, एकता कॉलनी, करंजे, सातारा), अजित लक्ष्मण वाघमारे (वय ३७, रा. ७0२, गुरुवार पेठ, सातारा), फिरोज खुदबुद्दीन झारी (वय ५६, रा. श्रीनगरी, तामजाईनगर, करंजे, सातारा), मुकदर शिराज मुलाणी (वय ३६, मु. पो. कोंडवे मशिदीशेजारी, ता. सातारा), सुनील बाबू जाधव (वय ५१, रा. दिव्यनगर, सातारा), इब्राहिम शेख (वय ३६, रा. विघ्नहर्ता कॉलनी, कोंडवे, सातारा) या दहा जणांचा समावेश आहे.

Web Title: Shahupuri police raid gambling den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.