शाहूपुरी पोलिसांची कारवाई : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
By Admin | Updated: January 7, 2015 23:25 IST2015-01-07T22:53:49+5:302015-01-07T23:25:48+5:30
अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

शाहूपुरी पोलिसांची कारवाई : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
सातारा : सांबरवाडी, ता. सातारा येथील शंकर रघुनाथ भोसले या दुचाकी चोरट्याकडून शाहूपुरी पोलिसांनी सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याला दि. १२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एक पथक सोमवार, दि. ५ रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना बोगदा परिसरातील नाना चौकात शंकर रघुनाथ भोसले (वय ३०) दुचाकीवरून यवतेश्वर बाजूने जाताना दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळील दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्याने सात मोटारसायकली चोरून नेल्याची कल्पना दिली.शंकर भोसले याने सातारा शहरातील राजवाडा भाजी मंडईसमोरून (आरजे 0७ एसजे ४१५९), यादोगोपाळ पेठेतील सुपनेकर खानावळ आवारातून (एमएच ११ क्यू ३४५७), राजवाडा नगरवाचनालय आवारातून (एमएच ११ एल ७६४९), अंनत इंग्लिश स्कूलच्या गेटसमोरून (एमएच ११ झेड ४६६५), यादोगोपाळ पेठेतील आनंदरंग अपार्टमेंटमधून (एमएच ११ डी ६१२९), सोमवार पेठेतून (एमएच ११ झेड ८७४६), तुळजाभवानी कॉम्पलेक्स पार्किंगमधून (एमएच 0४ सी ६५३२) तर एक अन्य एक अशा सात मोटारसायकली चोरल्याची माहिती दिली. त्याच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नसीमखान फरास, राकेश देवकर, अतिश घाडगे, किशोर जाधव, प्रवीण गोरे, श्रीनिवास देशमुख, लैलेश फडतरे, मनोहर वाघमळे, गिरीश रेड्डी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
उलट्या नंबर प्लेटने केला घात...
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे रात्रगस्तीचे पोलीस बोगदा परिसरात पेट्रोलिंग करत असताना शंकर भोसले दुचाकीवरून यवतेश्वरकडे निघाला होता. त्याची हालचाल संशयास्पद होती. तो जी दुचाकी (आरजे 0७ एसजे ४१५९) चालवत होता, त्यावर त्याने नंबरप्लेट उलटी लावली होती. यावेळी पोलिसांनी त्याला अडवून त्याचे नाव आणि गाव विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शंकरने जर नंबरप्लेट उलटी लावली नसती तर कदाचित तो पोलिसांना सापडला देखील नसता.