लसीकरणासाठी राष्ट्रवादीकडून मायेची सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:47+5:302021-04-25T04:38:47+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची भीती घालविण्यासाठी लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा आहे. खंडाळा ग्रामीण रुग्णालयात ...

लसीकरणासाठी राष्ट्रवादीकडून मायेची सावली
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची भीती घालविण्यासाठी लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा आहे. खंडाळा ग्रामीण रुग्णालयात यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, लसीकरणाला लोकांना भर उन्हात ताटकळत राहावे लागत असल्याचे लक्षात येताच, खंडाळा शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंडप टाकून लोकांना मायेची सावली उभी केली.
खंडाळा तालुक्यात कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य व महसूल विभागासह सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. मात्र, तरीही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. खंडाळा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या लोकांना तासनतास रांगेत उभे राहून लस घ्यावी लागत आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रुग्णालयाच्या बाहेर मंडप उभारणीचे काम खंडाळा शहर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना भर उन्हात सावलीचा दिलासा मिळत आहे. लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
खंडाळा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला मोठी गर्दी होते. नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून स्वखर्चातून मंडप उभारणी केली. त्यामुळे लोकांना उन्हापासून संरक्षण होण्यास मदत होत आहे. आम्ही सर्वजण जनतेच्या मदतीसाठी कायम सक्रिय राहात असतो. यापुढेही हे काम चालू राहील.
सागर गुरव, राष्ट्रवादी कार्यकर्ता
फोटो दशरथ ननावरे यांनी मेल केला आहे .