शिवणकर कऱ्हाडला; घट्टे किनवटला

By Admin | Updated: May 28, 2015 00:59 IST2015-05-27T23:51:11+5:302015-05-28T00:59:05+5:30

अधिकाऱ्यांच्या बदल्या : रमेश चोपडे फलटणचे ‘डीवायएसपी’

Sewing cray; Necklace | शिवणकर कऱ्हाडला; घट्टे किनवटला

शिवणकर कऱ्हाडला; घट्टे किनवटला

सातारा : जिल्ह्यातील दोन पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, दहिवडीसह साताऱ्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे कऱ्हाडच्या उपअधीक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.वरिष्ठ पातळीवरून राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले असून, अद्याप काही संबंधित अधिकाऱ्यांना बदलीचे पत्र मिळालेले नाही. कऱ्हाडच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळणारे मितेश घट्टे यांची किनवट येथे याच पदावर बदली झाली असून, आष्टीचे पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे लवकरच फलटणचे उपअधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. बुधवारी दिवसभर अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा पोलीस दलासह जिल्ह्यात सुरू होती. बदल्यांची पत्रे मिळाली नसल्याने या वृत्ताला तातडीने दुजोरा दिला जात नव्हता; मात्र नंतर विश्वसनीय सूत्रांकडून बदल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला गेला. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, फलटण, पाटण ही चार उपअधीक्षकपदे तसेच मनोज पाटील यांच्या बदलीनंतर उपअधीक्षकपद (गृह) अशी एकंदर पाच पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर, कोणकोणत्या ठिकाणी नवीन अधिकारी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. जिल्ह्याबाहेरून एक अधिकारी जिल्ह्यात येत असताना एक अधिकारी जिल्ह्याबाहेर जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sewing cray; Necklace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.