रस्त्यावरील सांडपाणी ठरतेय डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:47+5:302021-02-05T09:08:47+5:30

मलटण : फलटण शहरातील ऐतिहासिक पाचबत्ती चौक ते रविवार पेठ यादरम्यान नागरिक रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे हैराण झाले आहेत. याच ...

Sewage on the road is a headache! | रस्त्यावरील सांडपाणी ठरतेय डोकेदुखी!

रस्त्यावरील सांडपाणी ठरतेय डोकेदुखी!

मलटण : फलटण शहरातील ऐतिहासिक पाचबत्ती चौक ते रविवार पेठ यादरम्यान नागरिक रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे हैराण झाले आहेत. याच चौकातून पुढे गेल्यावर मलटण पूल लागतो, त्यामुळे मलटणला जाणारी सर्व वाहतूक याच वाहत्या सांडपाण्यातून जाते. या ठिकाणी दररोजच रत्यावरून सांडपाणी वाहत आहे. या सांडपाण्यामुळे रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. फलटण आणि मलटणला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने यावर साठणारे सांडपाणी प्रवाशांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहेत.

काही दिवसांपूर्वीच या ठिकाणचा रस्ता नव्याने करण्यात आला. त्या आधी हे सांडपाणी याच खड्ड्यात साठून राहत असे. नवीन रस्त्यावर सतत सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे या रस्त्याचा दर्जा खराब होऊन पुन्हा खड्डे पडायला सुरुवात होईल. त्यामुळे त्वरित हे सांडपाणी कायमचे बंद करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा. रस्त्यावरून वाहणारे हे सांडपाणी आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. या लहान मुले, वृद्ध तसेच गृहिणींना या सांडपाण्यातूनच वाट काढत चालावे लागते. त्यामुळे प्रत्यक्ष घाण पाण्याशी संपर्क येत असल्याने नागरिक हैराण आहेत.

एका बाजूला एका चौकाचे सुशोभीकरण करून फलटणला एक सुंदर शहर बनवण्यात आले तर दुसऱ्या बाजूला पाचबत्ती चौकासारखा शहराच्या मध्यवर्ती असणारा परिसर सांडपाणी व दुर्गंधीसाठी ओळखला जाऊ लागला आहे. पाचबत्ती चौकाचे ही सुशोभीकरण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

फोटो आहे..

२७मलटण

फलटण शहरातील ऐतिहासिक पाचबत्ती चौक ते रविवार पेठ यादरम्यान नागरिक रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे हैराण झाले आहेत.

Web Title: Sewage on the road is a headache!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.