शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

साताऱ्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरण ५० टक्के भरले, साठा ५३ टीमएसीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:54 PM

साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ५३.३० टीमएसी इतका साठा झाला असून, धरण ५० टक्के भरले आहे. तर नवजा येथे १३० आणि महाबळेश्वरला १३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देकोयना धरण ५० टक्के भरले, साठा ५३ टीमएसीवर पावसाचा जोर वाढला; नवजात १३० मिलीमीटरची नोंद

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ५३.३० टीमएसी इतका साठा झाला असून, धरण ५० टक्के भरले आहे. तर नवजा येथे १३० आणि महाबळेश्वरला १३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.गेल्या ११ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तर भात लागणीच्या कामाला वेग आला आहे.

बुधवारी रात्रीपासून तर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ५३.३० टीएमसी पाणीसाठा झाला असून, ३३ हजार ४९० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.यंदा गतवर्षीपेक्षा लवकरच धरणात ५० टक्के साठा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. बलकवडी येथे ४७, उरमोडी २७ आणि तारळी धरण परिसरात ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धोम धरणात ५.२३ टीएमसी, कण्हेर ४.३२, बलकवडी २.१, उरमोडी ४.९२ तर तारळी धरणात २.३६ टीमएसी इतका साठा झाला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ११ (३४४)कोयना १२७ (१९८०)बलकवडी ४७ (९३०)कण्हेर १७ (३१५)उरमोडी २७ (३९८)तारळी ६६ (६७९)जिल्ह्यात एकूण २३६ मिलीमीटर पाऊसजिल्ह्यात गुरुवारी पहाटे आणि बुधवारी दिवसभरात एकूण २३६.७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत एकूण सरासरी २१.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.सातारा- १६.६ (३२८.५), जावळी- २७.७ (५११.५), पाटण- ३२ (५००.३), कºहाड- ७.२ (२२२.९), कोरेगाव- ४.४ (१६३.४), खटाव - २.३ (१८५), माण- ० (८८.७), फलटण- ० (९३.३), खंडाळा ७.४ (१६०.८ ), वाई- ७.२ (२६४.६) आणि महाबळेश्वर- १३२ (१६०६.२). याप्रमाणे आजपर्यंत एकूण ४१२५.२ तर सरासरी ३७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर