शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सात हजार कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीचे संकट : राज्यव्यापी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:08 IST

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात जिल्हा परिषदेतील ७ हजार ८६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कर्मचाºयांची वेतन कपातीचे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देउपस्थित असलेल्या तीन हजार कर्मचाºयांना वेतन मिळणार

सातारा : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात जिल्हा परिषदेतील ७ हजार ८६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कर्मचाºयांची वेतन कपातीचे संकट उभे ठाकले आहे.प्रलंबित मागण्यांसाठी दि. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत राज्यभरातील राज्य सेवेतील हजारो कर्मचारी तीन दिवसांच्या राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत. शासकीय कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. कंत्राटी कामगावरावर सर्व मदार असून, हे कर्मचारी प्रलंबित असलेली कामे करण्यात मग्न दिसत आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मिळून १० हजार ३३८ कर्मचारी आहेत. त्यापैकी ७ हजार ८६ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. १९६ कर्मचारी रजेवर आहेत. तर ३ हजार ५६ कर्मचारी संप काळातही कार्यालयात उपस्थित राहिले आहेत.

‘नो वर्क, नो पेमेंट’ असे शासनाचे धोरण असल्याने जे कर्मचारी या संपात सहभागी झाले त्यांचा तीन दिवसांचा पगार कपात होऊ शकतो. त्यामुळे काही कर्मचाºयांमध्ये अस्वस्तता पसरली आहे. ते वरिष्ठ सहकार्यांच्या संपर्कात आहेत.कºहाडमध्ये संघटनांची निदर्शनेसंघटना आक्रमक; संपामुळे दुसºया दिवशीही कामकाज ठप्पकºहाड : राज्य सरकारी कर्मचाºयांनी सुरू केलेला संप हा दुसºया दिवशी बुधवारी त्यांनी कायम ठेवला. कर्मचाºयांच्या कºहाड पंचायत समिती, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाची शासकीय कार्यालये ओस पडली होती. कर्मचाºयांच्या संपामुळे नागरिकांची कामे होऊ न शकल्याने त्यांचे हाल झाले. बुधवारीही कºहाड पंचायत समिती कार्यालयासमोर विविध संघटनांनी सरकार विरोधी निदर्शने केली.बुधवारी संपाच्या दुपºया दिवशी विविध संघटनांनी सरकार विरोधी केलेल्या निदर्शनात पंचायत समितीचा कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, अस्थापना, एकात्मिक बालविकास, आरोग्य, शिक्षण यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्य सेवेतील विविध संघटनांनी मंगळवारी संपाचे हत्यार उपसले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत दि. ९ रोजीपर्यंत संप करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, नवीन निवृत्ती वेतन योजना रद्द करून जुनी योजना लागू करावी, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, निवृत्तीचे वय ५८ वर्षावरून ६० वर्षे करावे आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला. तो त्यांनी बुधवारीही कायम होता. दरम्यान, शिक्षण विभागासह तहसील कार्यालयातील कामकाजही पूर्णपणे ठप्प होते.दुसºया दिवशीही कामकाज ठप्पसातारा येथे शासकीय कर्मचाºयांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर दुसºया दिवशी बुधवारी सर्व शासकीय कार्यालयांतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेत राजपत्रित अधिकारी वगळता इतर अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. संपाच्या दुसºया दिवशी अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.दरम्यान, या संपात प्राथमिक शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने शाळाही बंद राहत आहेत. महसूल खात्याचे १ हजार ४४४ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समितीमध्ये शुकशुकाट होता.शाळा बंदमुळे विद्यार्थी घरीचजिल्हा परिषदेचे शिक्षकही या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून विद्यार्थी घरीच आहेत. स्वातंत्र दिन काही दिवसांवर आलेला असल्याने काही मुलं भाषणाची तयारी घरबसल्या करत आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.दूरध्वनी नुसताच खणखणकतोय.. : राज्य सरकारी कर्मचाºयांनी संप सुरू केला आहे. संपाचा बुधवारी दुसरा दिवस होता. त्यामुळे बहुतांश कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात दूरध्वनी खणखणत होते; पण उचलायला कोणताच कर्मचारी उपलब्ध नव्हता.