शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 11:12 IST

सातारा शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसातारकरांचे पोलिस अधीक्षकांना साकडे जीवावर बेतण्यापूर्वी उपाययोजना करण्याची माणगी

सातारा : शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.सातारा शहरात चार ते पाच ठिकाणी सिंग्नल यंत्रणा असली तरी केवळ पोवई नाक्यावरील सिग्नल सध्या सुरू आहे. या सिग्नलला तब्बल सात रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे वाहनांच्या रहदारीचे प्रमाणही जास्त आहे. या सिग्नलवर अलीकडे छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये वाहन चालकांचे जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वाहतूक समादेशक मधुकर शेंबडे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या सिग्नलवर कशामुळे अपघात होत आहेत, याचे निरीक्षण केले. त्यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या. वाहन चालकही अपघाताला जबाबदार असल्याचे दिसून आले. सिग्नल सुटण्यापूर्वीच काही वाहनधारक घाई करून सुसाट वाहने घेऊन जात आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या हवालदाराने हाताने पुढे जाण्याचा इशारा करणे गरजेचे असते. मात्र, पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते.

येथील पोलिस केवळ पावती फाडण्यामध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत करण्यामध्ये कोणालाही रस नाही. केवळ सिग्नलवर असलेल्या सेकंदावरच पोलिस अवलंबून राहत आहेत. काही पोलिस कर्मचारी सिग्नल संपण्यापूर्वी १५ सेकंद अगोदर तर काही कर्मचारी २० सेकंद अगोदर वाहतूक पुढे जाऊ देण्याचा हाताने इशारा करत आहेत. त्यावेळी विशेष म्हणजे सिग्नल सुरू असतो.पोलिसच जर वाहतुकीचे नियम मोडत असतील तर नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

हिरवे दिवे लागेपर्यंत पादचारी रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. हिरवा दिवा लागल्यानंतरच थांबलेली वाहतूक सोडण्यात यावी. अशी मागणीही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 

शासन, जनता, चालक, पादचारी यांच्या हितार्थ व सुरक्षिततेसाठी सिग्नलवरील नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे.-मधुकर शेंबडे (वाहतूक समादेशक)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtraffic policeवाहतूक पोलीस