अजयकुमार बन्सल यांना सात हजारावी कलाकृती भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:20+5:302021-02-05T09:14:20+5:30

कलेच्या विविध माध्यमांत काम करत असलेल्या डॉ. संदीप डाकवे यांनी आतापर्यंत सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील दिग्गजांना रेखाचित्र, शब्दचित्र, अक्षरगणेशा देऊन ...

Seven thousandth artwork gift to Ajaykumar Bansal | अजयकुमार बन्सल यांना सात हजारावी कलाकृती भेट

अजयकुमार बन्सल यांना सात हजारावी कलाकृती भेट

कलेच्या विविध माध्यमांत काम करत असलेल्या डॉ. संदीप डाकवे यांनी आतापर्यंत सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील दिग्गजांना रेखाचित्र, शब्दचित्र, अक्षरगणेशा देऊन सरप्राईज भेटी दिल्या आहेत. यापूर्वी डॉ. संदीप डाकवे यांनी शंभरावे रेखाचित्र पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, पाचशेवे रेखाचित्र पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, हजारावे रेखाचित्र अभिनेते भरत जाधव, दोन हजारावे रेखाचित्र अभिनेते सुबोध भावे यांना, तीन हजारावे रेखाचित्र अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना, चार हजारावे स्केच सुप्रसिद्ध गायिका कविता राम यांना, पाच हजारावे रेखाचित्र तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना, सहा हजारावे रेखाचित्र हरीष पाटणे यांना, तर सात हजारावे स्केच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिले आहे.

विशेष म्हणजे डॉ. संदीप डाकवे यांनी या कलेतून मिळणारे मानधन गरजूंना देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. (वा. प्र.)

फोटो : ३०केआडी०४

कॅप्शन : डाकेवाडी, ता. पाटण येथील डॉ. संदीप डाकवे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सात हजारावी कलाकृती भेट दिली.

Web Title: Seven thousandth artwork gift to Ajaykumar Bansal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.