शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्केट’वाल्यांचा भूलभुलैया: दिसतं तस नसतं; गुंतवणूक करून फसतं!

By संजय पाटील | Updated: December 18, 2024 15:40 IST

संजय पाटील कऱ्हाड : दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सात जणांची तब्बल ७० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कऱ्हाडात उघडकीस आला ...

संजय पाटीलकऱ्हाड : दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सात जणांची तब्बल ७० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कऱ्हाडात उघडकीस आला आहे. यापूर्वीही अशी बरीच प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. त्यामध्ये पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेत. मात्र, तरीही दामदुप्पटचा ‘भूलभुलैय्या’ कमी झालेला नाही. वेगवेगळी आमिषे दाखवून गुंतवणूकदारांना भुलवले जात असून त्यांची फसवणूक केली जात आहे.जिल्ह्यात अनेक गुंतवणूकदार सध्या ‘मार्केट’वाल्यांच्या नादी लागले आहेत. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त फायदा, हे मार्केटवाल्यांचे साधे सरळ गणित असून त्याचेच गाजर दाखवून मार्केटवाल्यांनी अनेकांचे पैसे गुंतवून घेतले आहेत. चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेने काही जणांनी स्वत:कडील पैसे गुंतवले आहेत, तर काही जणांनी शेजारी, पाहुणे, मेहुणे, मित्रांनाही पैसे गुंतवायला लावलेत. तसेच हातउसने पैसे घेऊन, कर्ज काढूनही काहींनी गुंतवणूक केली आहे.मात्र, त्यापैकी अनेक गुंतवणूकदारांमागे सध्या भुंगे लागलेत. पाहुणे, मेहुणे सगळेच पैशाचा जाब गुंतवणूकदाराला विचारत आहेत. मात्र, जिथे पैसे गुंतवले त्यांनी हात वर केल्यामुळे उत्तरे काय द्यायची आणि पैसे कसे परत मिळवायचे, हा प्रश्न सध्या अनेक गुंतवणूकदारांना सतावतोय.

मार्केटवाल्यांचं काय असतं आमिष?चांगला परतावा : अनेक जण गुंतवणूक करून घेताना गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. दरमहा परतावा आणि मूळ रक्कम सुरक्षित, ही फसवी ऑफर दिली जाते.आकर्षक व्याजदर : राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका तसेच पतसंस्थाही ठेवींवर जास्तीत जास्त ८ टक्केपर्यंत वार्षिक व्याजदर देतात. मात्र, फसवणुकीच्या उद्देशाने पैसे घेणारे दरमहा ४ ते ५ म्हणजेच वार्षिक पंचवीस ते तीस टक्क्याने परतावा देण्याचे आमिष दाखवतात.अल्पावधीत दामदुप्पट : गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी बँका, पतसंस्था किमान सात वर्षांचा कालावधी घेतात. मात्र, फसवणूक करणारे अगदी दोन ते चार वर्षांत दामदुप्पट देण्याचे ‘गाजर’ दाखवतात.मूळ रक्कम सुरक्षित : गुंतवणूकदाराने जी रक्कम गुंतवली आहे, ती रक्कम सुरक्षित राहणार असल्याची खात्री देत त्या रकमेचा धनादेशही काही जण देतात. मात्र, प्रत्यक्षात तो धनादेश बँकेत वटत नाही, हे गुंतवणूकदाराला फसवणुकीनंतर लक्षात येते.

ठेवींवर कोण किती देतं व्याजदर७ : राष्ट्रीयीकृत बँका९ : सहकारी बँका९.५ : पतसंस्था१० : पतपेढी१०.५ : क्रेडिट सोसायटी(आकडे टक्केवारीमध्ये)

गुंतवणूक करताना घ्या काळजीकष्ट करून आणि घाम गाळून कमावलेले पैसे असेच कुणाकडेही सोपवताना काळजी घ्यायला हवी. अल्पावधीत पैसे वाढवून मिळण्याचे आमिष आपली कष्टाची कमाई बुडीत घालवू शकते. चांगला परतावा, आकर्षक व्याज आणि कमी कालावधीत दामदुप्पट हे सध्या फसवणुकीचे फंडे बनले आहेत. त्यामुळे कोणत्याही खासगी क्षेत्रात पैसे गुंतवताना एकदा नव्हे तर दहा वेळा विचार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीMarketबाजारfraudधोकेबाजीPoliceपोलिस