खंबाटकी घाटात दोन अपघातांत सात जखमी
By Admin | Updated: April 19, 2015 00:45 IST2015-04-19T00:45:47+5:302015-04-19T00:45:47+5:30
दीडशे फूट खोल दरीत कार कोसळली

खंबाटकी घाटात दोन अपघातांत सात जखमी
खंडाळा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात दीडशे फूट खोल दरीत कार कोसळली व एक कार पुलाच्या कठड्याला धडकल्याने दोन अपघातांत सातजण जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास पुण्याहून सांगलीकडे जाणारी कार (एमएच १० बीएम २७८०) ही भरधाव वेगाने येत असताना महामार्गावरील पुलाच्या कठड्याचा अंदाज न आल्याने कठड्याला जोराने धडकली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी खंडाळा पोलिसांनी धाव घेऊन जखमींना मदत केली. ही धडक इतकी तीव्र होती, की गाडीचा चक्काचूर झाला. यात गाडीतील सर्वजण बचावले गेले.
तसेच शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील दत्त मंदिराच्या वळणावर कार (एमएच १२ डीवाय ११९६) उजव्या बाजूकडील दीडशे फूट खोल दरीत कोसळली. यात मेहश भुजबळ (वय ४४), सुजाता भुजबळ (४०), संकेत भुजबळ (१५) हे तिघे जखमी झाले. कार खोल दरीत कोसळूनही भुजबळ कुटुंबीय बचावले. खंडाळा पोलीस व खंबाटकी मदत पथकाने तातडीने दरीतील कारमधील जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. क्रेनच्या साहाय्याने अवघड स्थितीतील कार दरीतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. (प्रतिनिधी)