शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

एरंडाच्या बिया खाल्ल्याने सात मुली अत्यवस्थ

By admin | Updated: June 27, 2014 00:57 IST

पाटण तालुक्यातील निगडे येथील घटना

ढेबेवाडी : एरंडाच्या बिया खाल्ल्याने निगडे, ता. पाटण या दुर्गम गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सात मुलींना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊन त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. या सर्वच मुलींना कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ढेबेवाडीपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर वाल्मिक पठारावर असलेल्या निगडे या गावांत जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर याच गावातील काही मुलींनी घरी जाताना रस्त्याकडेला असलेल्या एरंडाच्या बिया दिसल्या. त्या खाल्ल्या त्यांनी खाल्ल्या. नंतर त्या घरी पोहोचल्यानंतर काही वेळात त्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला. ही बाब नातेवाइकांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी मुलींची चौकशी केली. मुलींनी एरंडाच्या बिया खाल्ल्याचे सांगितले.नेहरु युवा मंडळाचे कार्यकर्ते व माजी सरपंच हणमंत कदम यांनी ढेबेवाडीतील ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला. डॉ. सुनील कांबळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना कऱ्हाडकडे पाठविण्यात आले. मयूरी सुरेश कदम (वय ९), प्रिया सुरेश कदम (वय ७), सायली दाजी कदम (वय ७), साक्षी तानाजी टेटमे (वय ८), तेजस्वी तानाजी टेटमे (वय ७), मंदिरी सखाराम नांगरे (वय ८), रिया सुरेश कदम (वय ७) अशी बाधित मुलींची नावे आहेत. या सात मुलींवर कऱ्हाड येथे उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)