धोमच्या फार्म हाऊसवर बंदोबस्त
By Admin | Updated: August 19, 2016 00:16 IST2016-08-18T23:58:54+5:302016-08-19T00:16:00+5:30
‘लोकमत’च्या वृत्तानंतर-

धोमच्या फार्म हाऊसवर बंदोबस्त
संजीव वरे-- पसरणी -क्रूरकर्मा संतोष पोळचा फार्म हाऊस पाहण्यासाठी धोमकडे गाड्यांच्या रांगा... त्याचे शेत बनले प्रेक्षणीय स्थळ... ही बातमी गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त लावला तसेच त्याच्या फार्म हाऊसचे फाटकही कुलूपबंद करून आतील महत्त्वाचे सर्व पुरावे ताब्यात घेतले.
चार मृतदेह त्याच्या ज्या शेतात सापडले ते ठिकाण जणू आता बघ्यांसाठी प्रेक्षणीय स्थळच बनले होते. तर त्याने अनेकांविरोधात केलेल्या तक्रारींचे कागद त्याच्या येथील खोलीत पडलेले बाहेरून स्पष्टपणे दिसून येत होते. ज्या दुचाकीवरून त्याने भिरकीट केली ती दुचाकीही येथेच होती. खड्डे खणण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबीही गावाच्या प्रवेशद्वारावर दिसला होता.
वाईहून धोमकडे गाडी गेली अजून किती? धोम धरण परिसरात आणखी पाचजण? पोळचे सर्वच फार्म हाऊस आणि पोल्ट्री फार्मचे उत्खनन केले तर गेल्या १३ वर्षांतील सर्वच बेपत्ता सापडतील का? याबाबत तालुक्यातील प्रत्येक गावात चर्चेचा विषय ठरला होता.
पोळच्या पोलिस तपासातून आणखी किती प्रकरणाची सत्यता बाहेर येणार? याबाबतची अस्वस्थ करणारे वातावरण सध्या पाहावयास मिळत होते.
गेल्या १३ वर्षांच्या ‘पापाचा घडा’ वेलंग येथील मंगल जेधे याच्या खुनाच्या तपासात समोर आला आणि त्यानंतर त्याच्या कारनाम्याचे रूप त्याच्या घराजवळील व फार्म हाऊसवरील मृतदेह एक-एक बाहेर काढताना पाहिले. अजूनही एखादी प्रशासनाची गाडी गेली, अशी बातमी समजताच अजून किती? धोम धरण परिसरात अजून पाचजणांचे मृतदेह आहेत? पोळ याचे सर्वच फार्म हॉऊस आणि पोल्ट्री फार्मचे उत्खनन केले तर वाई तालुका व शेजारी
तालुक्यातील अनेक बेपत्ता सापडतील का? अशा अफवा व चर्चांना उधाण आले होते.