कातरखटाव येथे मारहाणीत एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST2021-03-13T05:12:38+5:302021-03-13T05:12:38+5:30

वडूज : कातरखटाव येथे एकास गंभीर मारहाण केल्याप्रकरणी येरळवाडी येथील एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

A serious beating at Katarkhatav | कातरखटाव येथे मारहाणीत एक गंभीर

कातरखटाव येथे मारहाणीत एक गंभीर

वडूज : कातरखटाव येथे एकास गंभीर मारहाण केल्याप्रकरणी येरळवाडी येथील एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, येरळवाडी येथील संतोष रामचंद्र दुबळे यास संशयित आरोपी सागर प्रकाश दुबळे (रा. येरळवाडी) याने गुरुवार, ११ मार्च रोजी येरळवाडी येथून मोटारसायकलवर घेऊन जाऊन, ‘मी तुला दारू पाजतो,’ असे म्हणून त्यास कातरखटाव ते येलमरवाडी जाणाऱ्या रोडलगत असणाऱ्या देशी दारूच्या दुकानापासून थोड्या अंतरावर रात्री साडेआठच्या सुमारास कशाने तरी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले होते. तसेच हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद सोमनाथ दुबळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे.

मारहाणीत संतोष दुबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक विपुल भोसले तपास करीत आहेत.

Web Title: A serious beating at Katarkhatav