कापिलमध्ये वीस बेडचा विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:15+5:302021-06-04T04:29:15+5:30
कोरोनाने जिल्ह्यात हाहाकार माजवला असून, गावातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कापील ग्रामपंचायतीने वीस बेड़चा कक्ष सुरू केला आहे. ...

कापिलमध्ये वीस बेडचा विलगीकरण कक्ष
कोरोनाने जिल्ह्यात हाहाकार माजवला असून, गावातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कापील ग्रामपंचायतीने वीस बेड़चा कक्ष सुरू केला आहे. यामध्ये आॅक्सिजन मशीन, वाफारा मशीन, पीपीई किट, सॅनिटायझर, गरम पाण्याची सुविधा, रुग्णांच्या वापरासाठी स्वछतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांसह प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून रुग्णांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.
या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सरपंच कल्पना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच धोंडीराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, पराग जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर केंगार, तलाठी राजेंद्र खुडे, भरत पाटील, नंदकुमार जाधव, तानाजी गायकवाड़ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात होम आयसोलेशनचा सल्ला दिलेल्या रुग्णांना त्यांच्या घरात स्वतंत्र बाथरूमसह विविध अडचणी असतात. घरी सुविधेचा अभाव असल्याने घरातील इतर व्यक्ती किंवा शेजाऱ्यांना संक्रमणाचा धोका वाढतो. या समस्येवर मात करण्यासाठी कापील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सुसज्ज विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.
फोटो : ०३केआरडी०१
कॅप्शन : कापिल, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सरपंच कल्पना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.