किरकसाल येथे विलगीकरण कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:57+5:302021-06-06T04:28:57+5:30

म्हसवड : संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यासाठी व कोरोनापासून गावातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व गावातील ग्रामस्थांसाठी किरकसाल ग्रामपंचायतीने ...

Separation room started at Kirkasal | किरकसाल येथे विलगीकरण कक्ष सुरू

किरकसाल येथे विलगीकरण कक्ष सुरू

म्हसवड : संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यासाठी व कोरोनापासून गावातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व गावातील ग्रामस्थांसाठी किरकसाल ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष उभारला आहे. कोरोनावर मात करून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी पंधरा बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव कोरोनामुक्त करण्याला यश आल्याने शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ पुरस्कार योजनेत सहभागी होऊन या स्पर्धेत निश्चितच पुरस्कार मिळविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे.

यावेळी माण पंचायत समितीच्या सभापती लतिका बबनराव वीरकर, उपसभापती तानाजीराव कट्टे-पाटील, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, तालुका वैद्यकीय अधिकारी कोडलकर, सहाय्यक गटविकास अधिकारी चौगुले, किरकसाल सरपंच शोभा कुंभार, अमोल काटकर, प्रकाश काटकर, दगडू काटकर, दत्तात्रय रसाळ, स्वाती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज अवघडे, तलाठी इनामदार, ग्रामसेवक विकास गायकवाड, स्वाती निकाळजे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत श्री ब्रह्मचैतन्य शाळेमधील विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

===Photopath===

050621\img-20210605-wa0083.jpg

===Caption===

किरकसाल ता. माण येथे आसोलेशन सेंटरची पाहणी करताना मान्यवर

Web Title: Separation room started at Kirkasal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.