शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, आराखडा तयार करण्याच्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:38 IST

कामाच्या दर्जाबाबत तडजोड नको..

सातारा : राज्यात समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरमहिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. स्वच्छतागृह बांधल्यानंतर त्याची स्वच्छता व देखभाल झाली पाहिजे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व उपअभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते, सर्व प्रकारचे पूल बांधणे, पथदिवे बसवणे, हॅम, नाबार्ड व इतर योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आढावा घेतला. बामणोली ते दरे व तापोळा ते अहिर केबल स्टे पूल, आपटी ते तापोळा मोठा पूल बांधणे, सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली येथील नवीन पूल बांधणे, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधणे, सैनिक स्कूल नूतनीकरण, पाटण शासकीय इमारत, वाई शासकीय इमारत बांधकाम आदी सर्व कामांच्या प्रगतीबाबत चर्चा झाली.प्रस्तावित कामे मंजूर करून घ्या, मंजूर असलेली कामे सुरू करून ती वेळेत पूर्ण करा, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. मेडिकल कॉलेजचे काम प्रगतिपथावर असून येत्या काही महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कामाच्या दर्जाबाबत तडजोड नको..काम घेणारा ठेकेदार कोण आहे हे पाहू नका. ज्याने कोणी काम घेतले असेल त्याच्याकडून संबंधित काम दर्जेदार झालेच पाहिजे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घाला. कामाच्या दर्जाबाबत तडजोड होऊ देऊ नका, अशा सूचनाही या बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गWomenमहिलाShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले