शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

स्वखर्चातून झाडे लावून पर्यावरण रक्षणाची साद!

By admin | Updated: January 16, 2017 18:22 IST

समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील सात तरुणांनी एकत्र येऊन रोड रेंजर्स या संस्थेच्या माध्यमातून

आॅनलाईन लोकमतशिरवळ (सातारा),दि. 16 - समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील सात तरुणांनी एकत्र येऊन रोड रेंजर्स या संस्थेच्या माध्यमातून मुंबई ते गोवा असा सायकलवर प्रवास सुरू केला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर  झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश देत महामार्गालगतच्या गावामध्ये स्वखर्चातून वृक्षारोपण करत गावकऱ्यांना पर्यावरण रक्षणाची साद घालत आहेत.

आधुनिक युगात तरुणाई सोशल मीडिया अन् इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली आहे. त्यांच्यातील ध्येय नाहीसे होत चालले असल्याचीही ओरड एकीकडे होत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. समाजात मात्र काही तरुण हे इतके समाजाप्रती ध्येयवेडे असतात की, ते समाजासाठी काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी धडपडत असतात.

मुंबई सेंट्रल येथील रोड रेंजर्स संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन प्रशांत मगदूम, रोहित धारक, रामचंद्र मोरया, अंकित वाघरे, सिद्धेश कांबळी, सागर कांबळी, चेतन पावडे या सात तरुणांनी समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुंबई-गोवा या मार्गाची निवड केली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणामुळे या महामार्गावर वृक्षांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आले. यामुळे या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सात तरुणांनी पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या गावागावांमध्ये स्वखर्चातून महामार्गालगत वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला. ह्यरोड रेंजर्सह्णच्या माध्यमातून मुंबई-गोवा असा सायकलवर प्रवास करत आहे. दरम्यान, संबंधित तरुणांकडून महामार्गावरील गावागावांमध्ये वृक्षारोपण करत ह्यझाडे लावा-झाडे जगवाह्णचा संदेश देत पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वीही तरुणांनी मुंबई ते अलिबाग अशी सायकलस्वारी काढत पर्यावरणाबाबत जनजागृती केली आहे.

हे सर्व तरुण शिरवळ येथे आले असता शिरवळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उपसरपंच उदय कबुले, सामाजिक कार्यकर्ते दिनेश भरगुडे, माजी उपसरपंच आदेश भापकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिरवळ ग्रामपंचायत सदस्य विजय पवार, शिवप्रेरणा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद ननावरे, शिंदेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मोहन सोनावणे, स्वप्नील जाधव, ललित खोपडे, पराग वाघ, अविनाश मगर, काका राऊत, वासुदेव भरगुडे, शिवराज भरगुडे, विशाल बडदे, नीलेश खरमरे, सुहित जाधव, चेतन जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)