विशाखा आढाव-भोने यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:44+5:302021-06-06T04:28:44+5:30
विशाखा यांची २००९ च्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवेतून कक्ष अधिकारी या पदावर मंत्रालयात नियुक्ती झाली होती. त्यांनी ...

विशाखा आढाव-भोने यांची निवड
विशाखा यांची २००९ च्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवेतून कक्ष अधिकारी या पदावर मंत्रालयात नियुक्ती झाली होती. त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे यशस्वीरित्या सेवा केली असून आता त्यांची जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई या विभागात अवर सचिव पदावर निवड झाली आहे. त्यांनी विशेष प्रावीण्यासह एमएबीएड पुणे विद्यापीठाची सेट आदी पदव्या प्राप्त केल्या आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच स्पर्धा परीक्षेचे विनामूल्य मार्गदर्शन, आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान, मुंबई संस्थेबरोबर फलटण तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजनाबरोबरच ओंड येथील ज्ञानदीप संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचे योगदान सुरू आहे.
फोटो : ०५विशाखा आढाव-भोने