विद्या पाटील यांची सल्लागारपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST2021-09-17T04:45:42+5:302021-09-17T04:45:42+5:30

कऱ्हाड : येथील रयत शिक्षण संस्थेच्या गाडगे महाराज महाविद्यालयातील जिमखाना विभागप्रमुख आणि वुमन्स मिलिटरी अकॅडमीच्या समन्वयक प्रा. विद्या पाटील ...

Selection of Vidya Patil as Advisor | विद्या पाटील यांची सल्लागारपदी निवड

विद्या पाटील यांची सल्लागारपदी निवड

कऱ्हाड : येथील रयत शिक्षण संस्थेच्या गाडगे महाराज महाविद्यालयातील जिमखाना विभागप्रमुख आणि वुमन्स मिलिटरी अकॅडमीच्या समन्वयक प्रा. विद्या पाटील यांची विजय दिवस समारोह समितीच्या सल्लागारपदी निवड झाली आहे. समितीचे सहसचिव विलासराव जाधव यांनी निवडीचे पत्र दिले. त्यांची निवड दोन वर्षांसाठी आहे. निवडीबद्दल प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी त्यांचा सत्कार केला. उपप्राचार्य प्रा. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे उपस्थित होते.

कऱ्हाडला न्यायालयात होणार लोक अदालत

कऱ्हाड : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात २५ सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होऊन प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन क-हाड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व्ही. व्ही. कठारे यांनी केले आहे. लोक अदालतमध्ये प्रलंबित दिवानी व तडजोड योग्य फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. कलम १३८ प्रकरणे, बँकांची रक्कम वसुलीचे दावे, मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद विषयक प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, इतर दिवाणी व तडजोड योग्य फौजदारी प्रकरणे अदालतमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

संजयनगरला दिव्यांग मेळावा उत्साहात

कऱ्हाड : संजयनगर-शेरे ग्रामपंचायत व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेमार्फत दिव्यांग मार्गदर्शन मेळावा झाला. सरपंच शोभाताई मस्के, उपसरपंच सर्जेराव मदने, अशोक मस्के, सुनील शिंगाडे, नाना जाधव, ग्रामविकास अधिकारी कोळी, सीताराम गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन पवार, पोलीस पाटील सचिन साळुंखे उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, पाटण तालुका अध्यक्षा विद्या करंडे, सचिव शामराव मदने यांनी मार्गदर्शन केले. संतोष सातपुते यांनी प्रास्ताविक केले. सुनील शिंगाडे व अशोक मस्के यांनी स्वागत केले. ज्ञानदेव वायदंडे यांनी संयोजन केले. सचिन साळुंखे यांनी आभार मानले.

शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून मदत

कऱ्हाड : पाटण तालुक्यातील मालदन येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलचे महापुरामध्ये प्रचंड नुकसान झाले होते. या शाळेला माजी विद्यार्थ्यांनी बाकडे, खुर्च्या, टेबल यासह अन्य साहित्य भेट दिले. महापुरामुळे शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना या मदतीमुळे चांगली सुविधा मिळणार असून शाळेला आणखी मदतीची गरज आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी प्रिया यादव, स्वप्निल माने, विनोद माने, रणजित काळे, महेश मस्कर, स्वप्निल मोरे, प्रणील पाचुपते, सत्यम पाचुपते, शैलेश काळे यांनी ही मदत केली.

Web Title: Selection of Vidya Patil as Advisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.