वैष्णवी गायकवाड हिची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST2021-01-08T06:03:47+5:302021-01-08T06:03:47+5:30

सातारा : स्पेस झोन इंडिया व एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे अंतराळात १०० उपग्रह सोडण्याचा जागतिक स्तरावरील अतिशय महत्त्वाकांक्षी ...

Selection of Vaishnavi Gaikwad | वैष्णवी गायकवाड हिची निवड

वैष्णवी गायकवाड हिची निवड

सातारा : स्पेस झोन इंडिया व एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे अंतराळात १०० उपग्रह सोडण्याचा जागतिक स्तरावरील अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष १०० उपग्रह बनवून घेण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चार, तर अनंत इंग्लिश स्कूलमधील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या वैष्णवी गायकवाड हिचा समावेश आहे. या निवडीबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

तरुणांची हुल्लडबाजी

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या कास, बामणोली या पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असले तरी काही तरुणांकडून तलावात जलविहार केला जात आहे. तलावाकिनारी पार्ट्या झोडल्या जात आहेत. अशा हुल्लडबाज तरुणांमुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

रस्ता डांबरीकरण

सातारा : यादोगोपाळ पेठेतील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खोदण्यात आला होता. पालिकेतर्फे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने वाहनधारकांनासह पादचाऱ्यांची सुरू असलेली कसरत बऱ्याच महिन्यांनंतर थांबली आहे.

Web Title: Selection of Vaishnavi Gaikwad