सुहास खाडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST2021-07-03T04:24:07+5:302021-07-03T04:24:07+5:30

म्हसवड : दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक व पळशी येथील रहिवासी सुहास हिराचंद खाडे यांची ...

Selection of Suhas Khade as Sub-Inspector of Police | सुहास खाडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

सुहास खाडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

म्हसवड : दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक व पळशी येथील रहिवासी सुहास हिराचंद खाडे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

माण तालुक्यातील पळशी येथील रहिवासी सुहास हिराचंद खाडे यांचा २००८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी खात्यांतर्गत घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. त्यात त्यांची निवड झाली आहे. २००३ मध्ये सातारा पोलीस दलात रुजू झालेल्या खाडे यांनी यापूर्वी सातारा, वडूज पोलीस ठाणे व दहिवडी उपविभागीय कार्यालयात उल्लेखनीय काम केले आहे. सध्या ते दहिवडी उपविभागीय कार्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. नीलेश देशमुख यांनी कौतुक केले.

010721\4156200-img-20210701-wa0034.jpg

फोटो- पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल सुहास खाडे यांचा सत्कार करताना जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बसंल

Web Title: Selection of Suhas Khade as Sub-Inspector of Police