सातारा जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:09+5:302021-08-29T04:37:09+5:30

मसूर : उस्मानाबाद येथे २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ४७ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी सातारा जिल्हा अमॅच्युअर ...

Selection of Satara District Amateur Kho-Kho team | सातारा जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघाची निवड

सातारा जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघाची निवड

मसूर : उस्मानाबाद येथे २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ४७ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी सातारा जिल्हा अमॅच्युअर खो-खो असोसिएशन संघाची निवड चाचणी कवठे (मसूर) ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर झाली.

सातारा जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे व राज्य क्रीडा प्रशिक्षक मनोहर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रीडा प्रशिक्षक प्रदीप बंडगर, प्रशांत कदम, अनिकेत मोरे, मयूर साबळे, शशिकांत गाढवे, ज्ञानेश्वर जांभळे, दिलीप माने यांच्या उपस्थितीत निवड चाचणी पार पडली.

निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे : निखिल विचारे-कर्णधार (फलटण), गणेश रजपूत (दादासाहेब चव्हाण माळवाडी), संग्राम कांबिरे (कऱ्हाड), जयराज कचरे ( कऱ्हाड), हरिओम शेलार, वरुण गाढवे (खंडाळा), केदार माने, ओंकार मासाळ (ओगलेवाडी) विजय चव्हाण (कवठे), प्रतीक जगताप, साहिल गुजर, अथर्व भासल (सोनवडी-गजवडी), राखीव खेळाडू आदित्य साळुंखे (कवठे), संस्कार थोरात (खराडे) तन्मय शिंदे (ओगलेडेवाडी ) तर संघ व्यवस्थापक प्रथमेश जाधव, प्रशिक्षक ओमकार कदम यांची निवड करण्यात आली. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप बंडगर यांनी आभार मानले.

Web Title: Selection of Satara District Amateur Kho-Kho team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.