समाधान शिनगारे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:19+5:302021-09-14T04:45:19+5:30
राज्यातील ग्रामपंचायतींच्या विकासाला गती मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद काम करते. या परिषदेच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या. कोळेतील ...

समाधान शिनगारे यांची निवड
राज्यातील ग्रामपंचायतींच्या विकासाला गती मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद काम करते. या परिषदेच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या. कोळेतील उपसरपंच समाधान शिनगारे यांनी गावातील प्रलंबित विकासकामांना सुरुवात केली असून, अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने घेतली असून, त्यांची परिषदेच्या कऱ्हाड दक्षिण सरचिटणीपदी निवड केली आहे. या निवडीचे पत्र नुकतेच समाधान शिनगारे यांना प्रदान करण्यात आले. उपाध्यक्ष सतीश इंगवले, मार्गदर्शक शंंकरराव खापे, जावेद मुल्ला यांच्याहस्ते समाधान शिनगारे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सतीश माने, अर्जुन कराळे, विजयकुमार शिंदे, जावेद फकीर, कुमार कराळे, रमीज इनामदार, राजेश देसाई उपस्थित होते.
फोटो : १३समाधान शिनगारे