राजेंद्र कदम यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST2021-09-09T04:47:32+5:302021-09-09T04:47:32+5:30

आता घरपोच सात-बारा सातारा : डिजिटल भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीनिमित्त गावनिहाय खातेदारांना मोफत डिजिटल सात-बारा ...

Selection of Rajendra Kadam | राजेंद्र कदम यांची निवड

राजेंद्र कदम यांची निवड

आता घरपोच सात-बारा

सातारा : डिजिटल भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीनिमित्त गावनिहाय खातेदारांना मोफत डिजिटल सात-बारा घरपोच वितरित केला जाणार आहे. याची जबाबदारी जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख कार्यालयाची असणार आहे. एकाचदिवशी हा सात-बारा विनामूल्य दिला जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी जादा बस

सातारा : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) जादा बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ११ आगारांतून लांब पल्ल्याच्या व जिल्हांतर्गत अशा एकूण १५० हून अधिक जादा बस सुटणार आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई व कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

राजेंद्र बोबडे यांची नियुक्ती

सातारा : अखिल भारतीय शिक्षक संघाच्या सातारा तालुकाध्यक्षपदी राजेंद्र बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी भोसले, जितेंद्र ढमाळ, शिवसागर जैस्वारा, विजयकुमार पोळ, चेतन तोडकर, महेश पडलवार, लक्ष्मण शेडगे यांनी त्यांचे कौतुक केले.

Web Title: Selection of Rajendra Kadam