Selection of Praveen Sark for Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीसाठी प्रवीण सरकची निवड

महाराष्ट्र केसरीसाठी प्रवीण सरकची निवड

फलटण : सातारा जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीसाठी खुल्या गटातून सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी येथील शुक्रवार पेठ तालीम मंडळ, फलटणचे पैलवान प्रवीण सरक यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक यांचा पुतण्या व महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद पै. राहुल सरक यांचे बंधू पै. प्रवीण सरक यांची मॅट विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवार पेठ तालीम मंडळ, फलटणच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक, नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, मिरगावचे पोलीसपाटील दत्तात्रय सरक पाटील, तालीम मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कुस्तीप्रेमी नागरिक, मिरगावचे ग्रामस्थ व सर्व पैलवान उपस्थित होते.

Web Title: Selection of Praveen Sark for Maharashtra Kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.