राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
By Admin | Updated: September 23, 2014 23:56 IST2014-09-23T22:25:00+5:302014-09-23T23:56:04+5:30
अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या सतरावी राज्य मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेतून या निवडी

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
सातारा : येथील सतीश कदम, संजय भिलारे व श्रीमंत गायकवाड यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या सतरावी राज्य मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेतून या निवडी झाले. त्यामध्ये सातारचे जलतरणपटू सतीश कदम यांनी पन्नास मीटर फ्री-स्टाईल या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तर शंभर, दोनशे व चारशे मीटर फ्री स्टाईल प्रकारात दुसरा क्रमांक मिळविला. संजय भिलारे यांनी पन्नास मीटर फ्री स्टाईलमध्ये दुसरा तर पन्नास मीटर बटरफ्लाय या प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला.
श्रीमंत गायकवाड यांनी दोनशे व चारशे मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम तर पन्नास मीटर, शंभर मीटर फ्री स्टाईलमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. यामुळे त्यांची गुलबर्गा (कर्नाटक) येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली.
निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शानभाग बंधू, सुधीर चोरगे, नितीन गुजर, डॉ. मिलिंद शिंदे, देवदत्त कवारे, राजन धुमाळ, सुभाष भोसले, धनी घोडके, भगवान चोरगे, चित्रासेन शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)