मनीषा चव्हाण यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST2021-05-08T04:40:20+5:302021-05-08T04:40:20+5:30

चाफळ : महाराष्ट्र राज्य कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या उपाध्यक्षपदी पाटण तालुक्यातील निसरे गावच्या मनीषा युवराज चव्हाण यांची ...

Selection of Manisha Chavan | मनीषा चव्हाण यांची निवड

मनीषा चव्हाण यांची निवड

चाफळ : महाराष्ट्र राज्य कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या उपाध्यक्षपदी पाटण तालुक्यातील निसरे गावच्या मनीषा युवराज चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील काही पथसंस्था, खाजगी सावकारी संस्था तसेच बँकांकडून कर्जदार जामीनदारांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याची दखल घेत मनीषा चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करीत असल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक अध्यक्ष ॲड. आप्पासाहेब घोरपडे यांनी दिली.

चव्हाण यांच्या निवडीबद्दल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ॲड. प्रसादजी करंदीकर, संघटक बापूसाहेब कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटक संगीता हिवाळे, सोमेश्वर भोंगडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Selection of Manisha Chavan